क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले बहुजन समाजाचे उद्धारक- नेपाल चिचमलकर
प्रविण भोंदे प्रतिनिधी
भंडारा: अन्याय अत्याचाराचा प्रखर विरोध करून सर्वसामान्य नागरिकांना योग्य मार्ग दाखविणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले होय. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा सत्य घटनेवर आधारित असलेला सिनेमा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात येणार होता. त्यांच्या जीवनात झालेल्या अन्यायाबद्दल लोकांना माहिती व्हावी. कारण महान समाज क्रांतीकारक, यशस्वी उद्योजक, विचारवंत, लेखक, प्रकाशक आणि गोरगरीब, शेतकरी व बहुजन समाजाचे उद्धारक म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत असे प्रतिपादन महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष नेपाल चिचमलकर यांनी केले.
ते भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष नेपाल चिचमलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सौ. योगेश्वरी उमप, तुळशीराम देशकर, पुष्पराज कडूकर, जवाहर निर्वाण, यशवंत निर्वाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुर्यज्योती महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यावेळी असर फाउंडेशन भंडारा च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंगावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच अरुण बनकर यांनी 'भिडेवाडा बोलला' हे गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. जयश्री सातोकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव अरविंद मंदुरकर, नरेश बेंदेवार, सुशीला निर्वाण, दुर्गाप्रसाद शेंडे, नितीन गायधने, रमेश गोटेफोडे, राम रतन मोहुर्ले, ईश्वर निकुडे, अनिल डोंगरवार, किशोर कांबळे, वृंदा गायधने तसेच महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment