चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन



*प्रतिनिधी :शिवप्रसाद कदम*

हदगाव तालुक्यातील मौजे चक्री येथे श्रीराम नवमी व महारुद्र हनुमान जयंतीनिमित्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य राम कथेचे आयोजन समस्त चक्री ग्रामस्थांनातर्फे करण्यात आले आहे या अखंड हरिनाम सप्ताहाला शनिवार दि.5 एप्रिल रोजी सुरुवात झाली असुन .या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 नवसाला पावणारा मारोती म्हणुन येथिल हनुमान देवस्थानाची महाराष्ट्रभर ओळख आहे. आठवड्यातील दर शनिवारी सकाळी 5 वाजल्यापासूनच येथे विविध भागातून व्यापारी, डॉक्टर, शासकीय कर्मचारी,रुग्ण, राजकीय नेते,नविन नोकरी लागलेले तरुण-तरुणी आपला नवस पुर्ण झाल्याने आरती व दर्शनास हजेरी लावतात.येथे बोललेला नवस पूर्ण झाल्याने महाराष्ट्रातील विविध भागातील भक्त मंडळी नगर भोजन म्हणून संपूर्ण गावाला गाव जेवण देतात.प्रत्येक वर्षाअखेर अंदाजे 30 ते 35 नगर भोजन नवस पूर्ण झालेली भक्त मंडळी हनुमंत रायाचे चरणी दुग्ध अभिषेक करून संपूर्ण गावाला गाव जेवण आपला नवस पुर्ण करतात.

 दर वर्षी प्रमाणे यावर्षीही येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन त्यानुसार दररोज पहाटे 4 ते 6 काकडारती भजन, सकाळी 6 ते 9 ज्ञानेश्वरीपारायण, दुपारी 1 ते 4 श्रीराम कथा , सायं 5 ते 7 हरिपाठ व रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन, असे दैनंदिन कार्यमाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिद्ध कीर्तनकारांची हरी कीर्तने होणार आहेत.

शनिवार दि.12 2025 रोजी सकाळी 8 वाजता हनुमान जयंतीनिमित्त श्रीची मिरवणूक व ग्रामप्रदषनेनंतर 11 ते 1 या वेळेत संतोष महाराज पळसोनेकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

No comments:

Post a Comment