कारधा नदिवर जलतरणाचे प्रात्यक्षिक यशस्वी
प्रविण भोंदे प्रतिनिधी
भंडारा : ग्रामपंचायत सालेबर्डी/सिरसघाट येथील ६ ते १४ वयोगटातील जलतरणपटू विद्यार्थ्यांचे एक हजार मीटर जलतरण प्रात्यक्षिकांचे आयोजन ग्रामपंचायत सालेबर्डी कडून करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे प्रशिक्षक रूपचंद निंबार्ते यांनी दररोज वैनगंगा नदीवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. जलतरणपटू विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांचे निरीक्षण करतांना जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन क्रीडा स्पर्धेत सालेबर्डी गावातील विद्यार्थ्यांसाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत ईलमे, तलवारबाजी असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील कुरंजेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात प्रात्यक्षिकाचे कार्य पार पडले.
त्यावेळी सालेबर्डी येथील सरपंच समता गजभिये, उपसरपंच जतन भाऊ टांगले, पोलीस पाटील सार्थिकाताई गजभिये यांनी जलतरण पटूंना शुभेच्छा दिल्या. पत्रकार अजय मेश्राम, नितीन कुथे, विलास केजरकर, प्रकाश बाबरे, अमरदीप निंबार्ते, रामलाल निंबार्ते, दुर्योधन टांगले, पतिराम टांगले, गौरीशंकर टांगले, वृषभ टांगले, आनंद गेडाम, अनिकेत टांगले, दयाराम बाभरे, पिंटू टांगले, हिरालाल टांगले, मुकेश टांगले, कल्पना निंबार्ते, जया निंबार्ते, अंकित निंबार्ते उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक मंगेश कपाटे अचल दामले, सुनील मेश्राम उपस्थित होते. जलतरण प्रात्यक्षिक कार्याचे मार्गदर्शक राम ब्राम्हणकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेबर्डी यांनी केले.
No comments:
Post a Comment