डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दिनदुबळ्याचे कैवारी - समीर नवाज
सन्मान महिला फाउंडेशनच्या वतीने आदरांजली
प्रविण भोंदे प्रतिनिधी
भंडारा: ज्या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, एक आगळी वेगळी ओळख देऊन समाजात मानाचे स्थान दिले. महिलाना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले. या देशाला समता, बंधुता आणि न्यायाची राज्यघटना दिली अशा या महान कायदे पंडित, ज्ञानाच्या महासागर, विश्वरत्न, दुखितांचे, पीडितांचे कैवारी, राष्ट्रनिर्माते होत असे प्रतिपादन समीर वर्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज यांनी केले.
ते सन्मान महिला फाउंडेशनच्या वतीने तिळक वार्डात आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वृंदा गायधने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्ते राजू (नीलकंठ) सतदेवे, अश्विन नागदेवे, अनिलबाई सतदेवे, ताराबाई भोरजार, कमलाबाई सतदेवे, वंदना सतदेवे, सन्मान महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा मिना सतदेवे, उपाध्यक्ष अंतकला शेंडे, राजू देशकर, शैलेंद्र सतदेवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण व ओमबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज भारत देशातच नव्हे तर इतर देशात कारभार व्यवस्थित चालत आहे. नागरिक- महिलांना शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व आर्थिक मुल्यसंवर्धन करण्यासाठी अनेक हाल अपेक्षा सहन करून कायदे बनविले. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवस साऱ्या विश्वात आनंदाच्या दिवस मानला जातो. त्याचप्रमाणे संविधानाच्या आधारावर विविध क्षेत्रात महिला- पुरुष उच्च पदावर गेलेले दिसतात. ही केवळ किमया भारतीय राज्यघटनामुळेच मिळालेले आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी व्यक्त केले.
सामान्य नागरिकांवर होत असलेला अन्याय मुकाट्याने सहन न करता अन्यायाविरुद्ध पेटून उठणे गरजेचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा* याप्रमाणे समाजातील नागरिकांना जागृत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वृंदा गायधने यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका बन्सोड व प्रास्ताविक ललिता नागदेवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव सीमा बन्सोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सचिव सीमा सतदेवे, उमा गीरधर, कल्पना सतदेवे, नंदिनी देशकर, तनिष्क सतदेवे, प्रतिक बन्सोड, शारदा भोरजार, सुचित्रा खळसे, भावना गोंडाणे, प्रियांशी भोरजार, मिना सतदेवे, आशा खडसे, वैखरी सतदेवे, तारकेश्वरी रत्नापुरे, सविता बांबोळे, सुरेंद्र सतदेवे, सक्षम भोरजार, बाली सतदेवे, केविंन बन्सोड, प्रिती सतदेवे, प्रियांंश नागदेवे, अद्विक सतदेवे, निखिलेश सतदेवे, तन्मय बांबोळे, माहीम सतदेवे, मितांश देशकर, मिहीर सतदेवे, अयांश गोंडाणे, ईशानी मेश्राम, परिधी सतदेवे, व सन्मान महिला फाउंडेशन भंडाराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment