शासकीय योजनांचा व पालकांच्या सहकार्यातून शाळा समृद्ध करा. - पालकमंत्री संजय सावकारे



प्रविण भोंदे प्रतिनिधी 

भंडारा :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा -2 बक्षीस वितरण समारंभ व  निपुण माता पालक गट, निपुण विद्यार्थी सत्कार सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी भंडारा जिल्ह्याचे पालमंत्री संजय सावकारे उद्गारले की,शासकीय योजना व पालकांच्या सहकार्यातून शाळा समृद्ध करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी पालक व शिक्षकांना केले.

     तर भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नरत रहावे. विद्यार्थी गुणवत्ता विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करन्याची गरज आहे.

        भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग द्वारा आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2 बक्षीस वितरण व निपुण माता पालक गट विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद अध्यक्षा सौ. कविता जगदीश उईके यांनी भूषविले. तर मुख्य अतिथी म्हणून भंडारा विधान सभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, हे होते तर अतिथी म्हणुन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, हे होते तसेच जिल्हा परीषद चे शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर , महीला व बालकल्याण सभापती सौ. अनिता नलगोपुलवार,समाजकल्याण सभापती , शितल राऊत, जि. प. सदस्य, रमेश पारधी गट नेते विनोद बांते , नारायण वरठे ,जि. प. सदस्या . सौ. वनिता डोये, सोमराज गिरडकर उपस्थित होते.

          या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील शासकीय गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव पंचायत समिती साकोली ला ११लाख, आणि द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरणा पं.स. तुमसर या शाळेला ५ लाख रुपये व तृतीय क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूल जांब या शाळेला ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. इतर व्यवस्थापनाच्या शाळा गटातून प्रथम क्रमांक गांधी विद्यालय कोंढा पंचायत समिती पवनी, यांना मिळाले तर द्वितीय क्रमांक राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कूल मुरमाडी तुपकर पंचायत समिती लाखनी, तृतीय क्रमांक शिवाजी विद्यालय इटान या शाळांना पुरस्कृत करण्यात आले 

       निपुन भारत अंतर्गत इयत्ता तिसरी पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान 2026 ते 20 27 पर्यंत प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील 189 निपुण विद्यार्थी व 189 माता पालकांचा शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा चे वतीने प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले स्वीप अंतर्गत निवडणूक विधान निवडणूक कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.     

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी केले .तर शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ठवकर व ज्योती नागलवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला अधिकारी, पालक विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली.


No comments:

Post a Comment