शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावणे आवश्यक -शेखर बोरसे
नंदगोपाल’ ची पावा शाळेत स्वच्छता कार्यशाळा यशस्वी
प्रविण भोंदे प्रतिनिधी भंडारा.
भंडारा- लहान मुले ही देवा घरची फुले असतात. हे अगदी खरं आहे. त्यांना चांगले- वाईट गोष्टी काय आहेत. काही कळत नसतात. मात्र आज स्पर्धेच्या युगात वावरत असतांना विद्यार्थी- विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानाबरोबरच चांगल्या सवयी आत्मसात करण्यासाठी कौटुंबिक वातावरण (कुटुंब), भौगोलिक परिसर, मोठया मंडळींच्या सानिध्यात राहून व शाळेतून शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन न्यु गर्ल्स संस्थेचे सचिव शेखर बोरसे यांनी केले.
ते पावा नवीन मुलींची शाळेत आयोजित नंदगोपाल फाउंडेशनच्या ‘क्लीन भंडारा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी - पालकांसमोर स्वच्छता व कंपोस्टिंगवर प्रात्यक्षिक कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यु गर्ल्स संस्थेचे कार्यवाह शेखर बोरसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थीनी नेत्ररोगतज्ञ् डॉ. आशा बारई (लांजेवार), नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार, पर्यावरण प्रेमी रविशंकर साकोरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, मुख्याध्यापिका सुनिता हुकरे, शिक्षकवृंद, नंदगोपाल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मार्ल्यापण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार यांनी घनकचरा नियोजन हे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक असून त्यासाठी कचऱ्याचे ओला सुका वर्गीकरण जरुरी असल्याचे सांगितले. ओल्या कचऱ्यापासून घरी खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. फाउंडेशनचे रविशंकर साकोरे यांनी नंदगोपाल फाऊंडेशनची कार्ये व कार्यप्रणाली बद्दल सविस्तर माहीती दिली. विलास केजरकर यांनी साफसफाई व वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे संबोधन केले. शाळेच्या माजी विद्यार्थीनी नेत्ररोगतज्ञ् डॉ. आशा बारई (लांजेवार) यांनी आपल्या उदबोधनात शाळेच्या आठवणींना उजाळा देऊन शाळेच्या गौरवशाली परंपरेबद्दल अभिमान व्यक्त केला.
नंदगोपाल फाऊंडेशन ने क्लीन भंडारा उपक्रमांतर्गत पावा नवीन मुलींची शाळा दत्तक घेतली आहे. हे उल्लेखनीय आहे. ह्याप्रसंगी शाळेला लोखंडी गेट फलक, कचराकुंड्या, क्लिनिंग लिक्विड, स्वच्छता उपयोगी साहित्ये फाउंडेशनतर्फे भेट देण्यात आली. शाळा कचरामुक्त करण्याचा ध्येय ठेवून शाळेत मागील वर्षापासून फाउंडेशनचे कार्य सुरु आहे. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यावेळी उपक्रमांतर्गत पावा नवीन मुलींची शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पर्यावरण विषयक पथनाट्य व नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता व वृक्षांचे जीवनातील महत्व समजावून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी राहांगडाले व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता हुकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वनिता खोकले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पर्यावरण प्रेमी भोजराज गौतम, हेमराज ठाकरे, सुंदरलाल मेघवानी, मोहन भाकरे, मनोज लांजेवार, भावेश बावनकुळे, श्यामली नाकाडे, प्रेमालाल मलेवार, विलास खोब्रागडे, रंजित खंगार, शरद हाके, मनिषा वंजारी, अंशु राऊत, योगिता काटेखाये, राणू करनाहके, मंगला साटोणे व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment