०२ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर दुसरे आमरण उपोषण सुरु
• आज उपोषणाचा पाचवा दिवस
• लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय वसतीगृह केसलवाडा (वाघ) येथे आदिवासी विद्यार्थ्याचा घातपात
•पोलीस अधिक्षकांच्या लेखी आश्वासनानंतरही पोलीस विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्याच्या हत्येची चौकशी नाही.
प्रविण भोंदे
भंडारा : जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील मौजा केसलवाडा (वाघ) येथे लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय/ वसतीगृह केसलवाडा (वाघ) येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला व त्याच वस्तीगृहात राहत असलेला विद्यार्थी धीरज सिताराम फरदे वय 11 वर्षे, राहणार - नवेगावबांध, तालुका - अर्जुनी (मोरगाव), जिल्हा -गोंदिया या आदिवासी विद्यार्थ्याचे दि. 21 जुलै 2024 रोजी दुपारी 4:30 ते 5:00 वाजता च्या दरम्यान राहत असलेल्या वसतीगृहात संशयास्पद निधन (घातपात) झाले. या दलित आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व धीरज च्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हावी म्हणून संबंधित शासन प्रशासनाला वेळोवेळी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीच्या वतीने निवेदन देण्यात आले. धिरज च्या घातपातास पाच महिन्याच्या कालावधी लोटल्यानंतरही गुण्हेगारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे न्याय्य मागणीकरीता दि. 14 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले असता जिल्हा पोलीस प्रशासनाने उच्च स्तरीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दि. 16 जानेवारी 2025 रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली. घटनेस आठ महिण्याचा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाने दिलेला शब्द न पाळता उलट पोलीस विभागाकडून प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे सदर घटनेची सिबिआय चौकशी करण्यात यावी व गुण्हेगारांना अटक करुन मनुष्यवधाचा गुण्हा दाखल करण्यात यावा. अशा या न्याय्य मागण्यांकरीता दि. 02 एप्रिल 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर संशयास्पद मृतक धीरज चे वडील सिताराम फरदे व केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे कार्यकर्ते महेन्द्र बाबुराव तिरपुडे हे आमरण उपोषणाला बसले असून गुण्हेगारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार..
ज्या विद्यार्थ्यांचा घातपात करण्यात आला तो आदिवासी कुटुंबातील असल्यामुळे व ज्या ठिकाणी हत्या झाली ती एका राजकीय नेत्याची शाळा असल्यामुळे देशाचा चवथा आधारस्तंभ न्युज मिडिया बातमी प्रसारित करण्यास मागे पुढे पाहतात. ईमानदार मिडिया वाल्यांनी बातम्या प्रकाशित केल्या परंतु बेईमान मिडिया वाल्यांनी पाठ फिरवली. कोणत्याही टीव्ही वर तर दाखवलीच नाही. नामवंत पेपर वाल्यांनी तर छापलीच नाही, कारण ती बातमी आहे एका आदिवासी विद्यार्थ्यांची, तो जर का जातीनं उच्च असता तर सगळ्या टीव्ही वाल्यांनी तासंतास बातमी दाखवली असती, पेपरमधून रकानेच्या रकाने भरून आले असते. अग्रलेख लिहील्या गेले असते. सरकारला धारेवर धरलं असतं आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी देव पाण्यात ठेवले असते. परंतु घटना एका राजकीय नेत्याची आहे आणि घात झालेला विद्यार्थी आदिवासी कुटुंबातील आहे....
सविस्तर असे की,
1. जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील मौजा केसलवाडा (वाघ) येथे लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय/ वसतीगृह केसलवाडा (वाघ) येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला व त्याच वस्तीगृहात राहत असलेला विद्यार्थी धीरज सिताराम फरदे वय 11 वर्षे, राहणार - नवेगावबांध, तालुका - अर्जुनी (मोरगाव), जिल्हा -गोंदिया या विद्यार्थ्याचे दि. 21 जुलै 2024 रोजी दुपारी 4:30 ते 5:00 वाजता च्या दरम्यान राहत असलेल्या वसतीगृहात निधन झाले.
2. लक्ष्मी शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालयातील वस्तीगृहात 677 विद्यार्थी निवासी राहत असून त्या विद्यार्थ्यांची देखरेख, नियंत्रण व सांभाळ करण्याची जबाबदारी ही शाळेतील/ वस्तीगृहातील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांची असताना सुद्धा धीरजचे निधन होणे ही बाब संशयास्पद आहेच. धिरज ची हत्या करण्यात आल्याचे नाकारता येत नाही. एका आदिवासी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचे जीव गेला असल्यामुळे पोलीस विभागाकडून थातुरमातुर चौकशी करून, दोन पानी चौकशी अहवाल तयार करून सदर प्रकरण दडपल्या जात आहे यात काही शंका नाही.
3. वसतीगृहात अनेक कर्मचारी असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांवर लक्ष नाही का? यापूर्वी सुद्धा याच खिडकी मधून काही विद्यार्थी पळून गेले असे तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कळले. यापूर्वी जर अशा घटना घडल्या तर त्यानंतर संस्था चालकांनी किंवा जिम्मेदार कर्मचाऱ्यांनी त्यावर प्रतिबंध घालण्याकरता उपाययोजना का केल्या नाहीत हे पण एक कोडेच आहे.
4. मृतक धीरज च्या वडिलानी पो. स्टे. लाखनी येथे केलेल्या तक्रारीनुसार धीरजचे आकस्मिक निधन झाले नाही तर या घटनेला लक्ष्मी शिक्षण संस्थाचे संचालक मंडळ, स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा व वस्तीगृहाचे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे धीरज चे प्राण गेले आहे.
5. यावरून असे निदर्शनास येत आहे की, लक्ष्मी शिक्षण संस्था चे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांचे सदर सैनिकी शाळेतील व वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर हेतू परस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. धीरज सिताराम फरदे या विद्यार्थ्याचे अकस्मात निधन झाले नसून हेतूपरस्पर वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांचे हातून काहीतरी अनहोनी घटना घडून धीरजचे प्राण गेले यात काही संशय नाही.
न्याय्य विषयक मागण्या
i) धीरज च्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोषी शालेय कर्मचारी/अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
ii) धीरज सिताराम फरदे या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय व वस्तीगृहात चालत असलेला हलगर्जीपणा, घडत असलेल्या दुर्दैवी घटना व शासनाच्या निधीची लूट करणाऱ्या संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग यांची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करुन गुन्हेगारांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
iii) या घटनेस जबाबदार जिल्ह्यातील संबंधित शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी (आदिवासी विभाग) यांचे दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे या शाळेत व वस्तीगृहात शासकीय निधीचा दुरुपयोग होत असल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
iv) धीरज फरदेच्या मृत्यूची थातूरमातूर चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
v) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी भंडारा व शिक्षणाधिकारी भंडारा यांच्या बेजबाबदारपणामुळे, दुर्लक्षित पणामुळे, यांच्या कर्तव्य कसूरतेमुळे सदर घटना घडण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. करिता कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात यावे.
vi) सदर विद्यालयातील वसतीगृहात अधीक्षक व जबाबदार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याचे दिसून आले. वसतिगृहात 677 विद्यार्थी असून सुद्धा आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे वेळेवर उपचार होत नसल्यामुळे धीरज फरदे या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. या आदिवासी सैनिकी विद्यालयाच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करून शासनाच्या निधीची लूट होत आहे. करीता सदर संस्थेची मान्यता रद्द करून सदर सैनिकी विद्यालय संबंधित प्रशासनाकडे सोपविण्यात यावे.
vii) सदर घटनेचे पुरावे नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
viii) पीडित कुटुंबास ₹ 50 लाख (रुपये पन्नास लाख) रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी.
ix) पीडित कुटुंबास न्याय मिळावा म्हणून उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यास व मृतक धीरज फरदे च्या पालकास काही कमी जास्त झाल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी प्रशासनाची असेल.
झोपलेल्या शासन प्रशासनाला जाग यावी व सदर मुद्द्यांकडे शासन प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करुन धिरज फरदे च्या मृत्यूस जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणून न्याय्य मागणी करीता दि. ०२ एप्रिल २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. योग्य न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू राहणार.
उपोषण स्थळी केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्लीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांनी शासन प्रशासनाला उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान केले. उपोषणादरम्यान उपोषण कर्त्यांस वा त्यांच्या परिवारासोबत उचित - अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जिम्मेदारी शासन प्रशासनाची असेल असे निवेदनात नमूद आहे.
No comments:
Post a Comment