शिरड ग्रा. पं. मध्ये ग्रामदरबार व मोफत आरोग्य शिबिर संपन्न
*प्रतिनिधी:शिवप्रसाद कदम*
येथून जवळच असलेल्या मौजे शिरड येथे ग्रामदरबार सभा घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच यावेळी आरोग्य विभागाच्या वतिने ५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली.
आरोग्य विभागाकडून मोफत तपासनी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी तालूक्यातील पं.स. विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशु संवर्धन, समाज कल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, सिंचन, जलसंधारण, महिला बचतगटासह तालुक्यातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पशुधनाच्या आहार व आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची माहीती दिली.
विविध योजनांची अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शरद चौरे होते. यावेळी हदगावचे विस्तार अधिकारी पवार, कृषी विस्तार अधिकारी सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे,अंगणवाडी प्रवेशिका वानखेडे मॅडम महिला व अंगणवाडी कर्मचारी का बालकल्याण विभागाच्या अधिकारी मुदखेडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, ए.पी. ओ. सुर्यवंशी, घंटेवाड, हिरप, ग्रामविकास अधिकारी राहूल गिरबिडे, माजी सरपंच संजय कल्याणकर माजी उपसरपंच बाबाराव बोरकर अं .भा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश बोरकर चेअरमन दादाराव ठाकरे अशोक शुरोशे राघो जाधव प्रेमानंद पाटील पुंजाराम गुंजकर बालाजी ठाकरे गजानन महाजन प्रकाश भांडवले वसंत जाधव अंकुश कल्याणकर अविनाश काकडे बाळू हिंगाडे विश्वनाथ कल्याणकर महीला व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment