भंडारा येथे ३० एप्रिल पासून नि: शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



प्रविण भोंदे  प्रतिनिधी 

भंडारा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा तसेच जाणता राजा स्पोर्ट अकॅडमी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० एप्रिल २०२५ ला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन भंडारा येथे ग्रिष्मकालीन नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

         कुस्ती प्रशिक्षण शिबिर सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत राहणार आहे. शिबिरादरम्यान शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींना फ्रिस्टाईल, ग्रीको व रोमन कुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

          तरी जिल्ह्यातील शालेय व ओपन गटातील युवक- युवतीने ग्रीष्मकालींन नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे व अधिक माहितीसाठी कुस्ती प्रशिक्षक अशोक बन्सोड मोबाईल नंबर ९८६०७६२०२२, शुभम बागडे- ७०२०९७१२१९ व मार्गदर्शक विलास केजरकर ९७६४४९७९४९ यांच्याशी संपर्क साधावे.

No comments:

Post a Comment