संजीवनी सखी संघाचे उद्घाटन थाटात
प्रविण भोंदे भंडारा.
भंडारा:- संजीवनी सखी संघ भंडारा व नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैशाली नगरातील सद्द्धम बुद्ध विहार येथे महिला मेळावा व संजीवनी सखी संघ शाखेची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या किर्ती गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शहारे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजीवनी सखी संघ नागपूरच्या अध्यक्षा विभावरी गजभिये, उपाध्यक्ष सुवर्णा डोंगरे, वंदना देशभ्रतार, अध्यक्ष निशा लोखंडे, सचिव शिल्पा चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत मागील ११ वर्षांपासून संजीवनी सखी संघ महिलांचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी स्वतःला सक्षम कसे करता येईल. सोबतच आपल्या समाजाची, शैक्षणिक, सामाजिक आर्थिक गुणवत्ता कशी सुधारेल यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी आपल्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना देण्यासाठी नृत्य व गीत गायन करून कलेचे सादरीकरण करण्यात आले.
त्यावेळी संजीवनी सखी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त महिलांनी संजीवनी संघाचे सभासद बनण्याचे आवाहान केले आहे. कार्यक्रमात महिलांचा भरघोस प्रतिसाद दिला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा गजभिये यांनी केले तर उपस्थितांचे आभार कपिला रामटेके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनाली खापर्डे, किरण शेंडे, संतोषी बोदले, सरिता गजभिये, कुंदा रामटेके, सारिका नागदेवे, शालिनी भालाधरे. नेहा सुखदेवे .कविता ताई सरादे .चंदा गजभिये, वंदना भोयर, प्रगती बागडे, अल्का वासनिक, वैशाली वालदे व संजीवनी सखी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment